My heartful thanks to Dr. Rajaram Patil for Marathi translation.
English language link : In search of farmer……
Bengali language link: নতুন দিনের কৃষকদের খোঁজে ????
Telugu language link రైతు శోధన ........... లో
Tamil language link: எங்கே விவசாயி? (source)
Assamese language link: Krikhokor hondhanot
Bengali language link: নতুন দিনের কৃষকদের খোঁজে ????
Telugu language link రైతు శోధన ........... లో
Tamil language link: எங்கே விவசாயி? (source)
Assamese language link: Krikhokor hondhanot
भारतासाठी हि एक शरमेची बाब आहे कि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सामान्य गोष्ट बनून राहिलेली आहे,जर हे थांबवायचं आसेल तर आपण ज्यांनी नुकताच पोंगल जो खरोखर शेतकऱ्यांचा सण आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला यावर नक्कीच विचार केला पाहिजे .फार थोड्या वर्षापूर्वी भारत आपल अधिकच उत्पादन परदेशी निर्यात करत होता परंतु गेल्या कांही वर्षांपासून आपण अन्नाबाबतीत परावलंबी झालो आहोत ,आपणास भात, गहू ,डाळी आणि साखर यांची आयात करावी लागत आहे व आपली शेतीयोग्य जमीन आणि उत्पादकता दोन्ही
संकुचीत होत आहे ,या परिस्थितीने सन १९९६-२००७ या कालावधीत जवळपास १,५०,००० शेतकरयांचे जीवन संपवले आहे ,दुर्दैवाने परिस्थिती अशीच राहिली तर भारतास परकीयांवर पूर्णतः अवलंबून राहून अन्नाची भीक मागावी लागेल, भविष्यात अशा परिस्थीतीचे शिकार आपणच असू .
कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतात ? भाव नाही म्हणून,कमी उत्पन्न,खते,बी बियाणे यासाठी काढलेल्या कर्जामुळे कि विशेषतः बी टी बियाण्यामुळे ?.
शेतकरी हा पैश्याच्या हव्यासापोटी कापूस हे पिक वारंवार एकाच जमिनीत घेतो त्यामुळे जमिनीची सुपिकता संकटात येते आणि मग जास्त प्रमाणात खते आणि कीटक नाशके वापरण्यास तो मजबूर होतो ,नवीन वा प्रतिकार क्षमता वाढलेल्या किडी त्याला आणखीनच हतबल करतात,रोग आणि किडीचा प्रतिबंध त्याला परवडेनासा होतो.आपण अगदी शालेय जीवनापासून शिकत आहोत कि पिकांची फेरपालट आणि सुपिकता याचा सहसंबंध असतो.कापुस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतो निराशेतून ?,आपण सारे शेतीतून पिकवीलेले खातो पण शेती आणि शेतकऱ्यास कधी प्रतिष्ठित मानत नाही वा प्रतिष्ठा देत नाही ,सर्वात महत्वाचे म्हणजे शेती हा कांही आता फायदेशीर व्यवसाय राहिलेला नाही ,आडते ,व्यापारी,दलाल आणि आता सुपर मार्केट्स हेच खरे नफा मिळवतात, असे कोणते औद्योगिक उत्पादन आहे कि त्याची किमंत ग्राहक ठरवतो? उदाहरणार्थ पेन घेवू त्याची किमंत हि त्याच्या कच्च्या मालाची किमंत, प्याकिंग , वाहतूक, उत्पादकाचा नफा, दलालांचा फायदा, कर या सर्वानी मिळून बनते पण हेच शास्त्र कृषी मालास मात्र लागू पडत नाही. कृषी मालाची किमत मात्र विकत घेणारा ठरवतो ,भारत हा त्याच्या नैसर्गिक संपदेमुळे कधीही अभावग्रस्त देश न्हवता परंतु इतिहास काळात भारताला जो दुष्काळाचा सामना करावा लागला तो त्या वेळच्या शासकांच्या प्रशासकीय चुकांमुळे जसे कि ब्रिटीश काळी दुहेरी कर, एक तृतीयांश उत्पादन कर म्हणून घेत ई. एक प्रवाद असा आहे कि शेतकरी कुटुंबातील शिकलेला विद्यार्थी शेती व्यवसायाकडे पाठ फिरवतो. असे कुठल्या उद्योगपती बाबत घडेल कि त्याचा वारस त्याचा पावलावर पावुल ठेवणार नाही कारण फक्त तो शिकलेला आहे म्हणून वस्तुतः व्यवसाय जर फायदेशीर असेल तर निश्चितपणे तो व्यवसाय स्वीकारील जो त्यांच्या वाडवडीलांचा आहे, फक्त राजकारण हे एकच क्षेत्र असे नाही तर अशी भरपूर उदाहरणे देता येतील.
जगात कापूस उत्पादनात भारत न. २ आहे. कोणताही देश जागतिक दृष्ट्या कायमच पहिल्या दुसऱ्या न. वरती राहू शकत नाही. कारण जमिनीची सुपिकता त्याला तसे राहू देत नाही, एक तर एक पिक करून जमिनीची सुपिकता हरवून जाते याला अपवाद म्हणजे ,ताग ज्यात भारत आणि बांगलादेश हे नेहमी पहिले आणि दुसरे जागतिक उत्पादक आहेत आणि हे कधी बदलेल वाटत नाही कारण जगात दुसऱ्या देशांकडे तागांसाठी योग्य हवामान नाही. आपण हे असेच चालू द्यायचे का? तुम्ही आणि मी यामुळे निश्चितच प्रभावीत होणार आहोत. मला माझे नेमके विचार लिखाणातून तुमच्या पर्यंत पोहचवणे थोडेसे अवघड होत आहे. पण आपण जर या विषयी थोड्या गंभीरतेने विचार केला तर परिस्थिती पुरेशी स्पष्ट होईल. मला वाटत कि मी यासाठी काही तरी करायला हवं, कमीत कमी एखादा छोटासा प्रयत्न तरी, मला वाटत प्रत्येक खेड्यात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतः गट स्थापावेत ,बचत गटसारखे आणि गट शेती करावी धान्य,भाजीपाला,फळे,फुले आणि तेलबिया जमिनीच्या सुपिकतेशी तडजोड न करता घाव्यात जेणे करून वर्षभर सर्वाना काम असावे अशा पद्धतीने लागवड करावी एक अशी योजना असली पाहिजे कि त्यात गुंतवणूक, काम आणि नफा हे सर्व नियंत्रित असाव हि योजना व्यवस्थीतपणे राबवली गेली पाहिजे यासाठी सरकारी मदतीची निश्चीतच गरज आहे सरकार/शासन यासाठी एक वेगळा विभाग स्थापू शकत किंवा आहे त्या कृषी केंद्र मार्फत प्रत्येक जीलाय्हात जिल्हयात जाळ विनु शकत. हि केंद्रे जमिनीची सुपीकता पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन त्या विभागासाठी/क्षेत्रासाठी पद्धती ठरवतील व त्यासाठी लागणारी तांत्रिक वा सर्व प्रकारची मदत देऊ शकतील बँका हि यात अतिशय महत्वाची भूमिका योग्य वेळी पतपुरवठा करून निभावू शकतील भारत जर शेजारील देश जसे अफगाणिस्तान,बांगलादेश,आफ्रिका यांना मदत करतो तर स्वतःच्या शेतकऱ्यांना का मदत देऊ शकत नाही. सर्व प्रकारचे वेगवेगळे कर आपल्याकडे आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या योजनांसाठी कर लावणे अशक्य नाही. पिकांची फेरपालट, जमिनीची सुपिकता कायम ठेऊ शकते आपण यासाठी जंगलाचा आदर्श घेऊ शकतो जिथे कधी किडीमुळे सर्व काही नष्ट झालेलं पाहायला मिळत नाही शेतकऱ्यांना प्रत्येक सुगीत फायदा मिळाला पाहिजे मित्र पिकामुळे जरी एखाद पिक गेल तरी बाकीची पिक त्याला तारू शकतील गुंतवणूक, पैशाची आणि श्रमाची वाया गेली नसली पाहिजे. नैसर्गिक आपत्तीत सर्व काही नष्ट होईल अशी व्यवस्था नसावी आणि दुर्देवाने अशी परिस्थिती आली तर सरकारने योग्य ती भरपाई करून दिली पाहिजे ,वीज हि एक अशी गोष्ट आहे कि सरकारने ती प्राधान्याने पुरवायला हवी ,बहुराष्ट्रीय कंपन्यांना वीज देण्यापेक्षा तेवदीच वीज कितीतरी हेक्टर शेतीसाठी उपयोगी पडेल .नवनवीन उधोगाना सवलती देण्यापेक्षा त्या शेतीला दयाव्यात किंवा शेतीपूरक जसे कि बियाणे ,खाते , कृषी अवजारे ,अन्न प्रक्रिया ,ई. उद्योगांना सर्वात जास्त सवलती असाव्यात .
यामुळे कांही उलथापालथी होवू शकतील पण मुठ्भरांसाठी सर्वाना जगवणारी जमीन नापीक होऊ नये म्हणून हे करावे लागेल ,सुपिक् जमीन,परंपरागत ज्ञान असणारा शेतकरी यांना हरवले तर ते परत तयार होणे मुश्कील ,सर्वात महत्वाचा धडा आपण हरीतक्रांतीतून घेतलेला आहे कि फक्त हायब्रिड बियाणे ,रासायनिक खते आणि कीटकनाशके म्हणजे शेती न्हवे तर फुकुओका आणि इतर नैसर्गिक शेती त्य् तज्ञां कडून आपण शिकल पाहिजे कि जास्त कृषी उत्पादन हे फक्त निसर्गाशी सहकार्य करूनच मिळवता येते ना कि निसर्गावर विजय मिळवून ,दुसरा एक धोका असा दिसतो कि जनुकीय परावर्तीत बियाण्यांना दिलेली परवानगी ,जिवानुंतील विषारी गुणधर्म पिकात आणून पिकच किडीला विषारी बनवणे म्हणजे जमिनीला देखील विषारी बनवणे होय ,वस्तुस्थिती अशी आहे कि बरेचसे आफ्रिकन देश या बी .टी बियाण्याच्या विरोधात आहेत कारण त्यांच्या मते हे त्यांची सुपीक जमीन नासवून टाकेल .
शेतकऱ्यांना नैसर्गिक,सेंद्रिय ,बायोडायनामिक ,पारंपारिक अशी कोणत्याही प्रकारची शेती करू द्यावी ना कि कशाची सक्ती करावी प्रथम त्यांना जमिनीची सुपिकता टिकवून शेती करण्यास प्रोत्साहन द्याव आणि नंतर हळूहळू शाश्वत शेती करण्यास प्रोत्साहन द्याव.
don't hesitate to give your comments,
suggestions, opinions, corrections.......
for
typing in বাংলা , ગુજરાતી , हिंदी , ಕನ್ನಡ , മലയാളം, मराठी , नेपाली , ଓଡ଼ିOriya, ਪੰਜਾਬੀ , தமிழ், తెలుగు and اردو .
follow the link & download a small app to your computer, this works in
offline very well.